Satara : तारळी नदीच्या पुलाखाली सापडला महिलेचा मृतदेह
Updated On:

उंब्रज : भोसलेवाडी (ता. कराड) गावाच्या हद्दीत तारळी नदीवरील पुलाखाली नदीपात्रात एका 30 वर्षांच्या अनोळखी महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 12) रात्री 8.30 च्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत रस्ते कामगार बापिना रवींद्र जेना (रा. भोसलेवाडी, ता. कराड, मूळ रा. घंटेस्वर, बनसाडा, तोट्टापडा, ता. चांदबली, जि. भद्रक, ओदिशा) यांनी खबर दिली आहे.
या मृतदेहाची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली आहे.





