Satara : सातारा येथील संस्कृत पंडित वेदमूर्ती शंकरशास्त्री दामले (वय ८९) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने खासगी रुग्णालयात निधन झाले. येथील खिंडीतील श्री गणपती आणि कुरणेश्वर देवस्थान ट्रस्टचे ते विद्यमान अध्यक्ष होते. या ट्रस्टच्या स्थापनेपासून देवस्थानच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. सातारा येथील भारती भवन संस्था (श्री शंकराचार्य मठ) या संस्थेचे ते विद्यमान सचिव होते. अद्वैत वेदांत विद्यापीठ या संस्थेचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले. सातारा येथील आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयात अनेक वर्षे त्यांनी संस्कृत अध्यापनाचे काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, तीन कन्या जावई, नातवंडे असा परिवार आहे