Satara : शांतिगिरी महाराजांच्यावतीने आज ना. गोरे यांचा सन्मान
Updated On:

दहिवडी : ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सन्मान सोहळा उद्या, दि. 9 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मलवडी (ता. माण) येथील श्री शांतिगिरी महाराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होणार आहे.
वाराणसी येथील श्री पंचदशनाम जुना आखाडा, मलवडी येथील जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि वडियावीर (गुजरात) येथील बुधगिरी महाराज जनसेवा प्रतिष्ठानचे प्रमुख महंत शांतिगिरी महाराजांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ना. गोरे यांचा सन्मान होणार आहे.
यावेळी मलवडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





