सातारा | जिहे-कटापूरचे योजनेचे पाणी पोहचले नेर तलावात

Updated On:
सातारा | जिहे-कटापूरचे योजनेचे पाणी पोहचले नेर तलावात

पुसेगाव (प्रतिनिधी) – खटाव तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या जिहे-कटापूर योजनेचे पाणी सोमवारी सायंकाळी नेर तलावात पोहचले. या पाण्याचे पूजन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. त्यावेळी त्यांचे समर्थक आणि काेरेगाव व खटाव तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.

1995 साली मंजूर झालेल्या या योजनेचा फायदा खटाव तालुक्यातील दुष्काळी भागाला मोठया प्रमात होणार असल्याने या भागातील शेतकरी या योजनेकडे डोळे लावून बसले होते. अखेर 26 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नेर तलावात पाणी आल्याने शेतकरी वर्गात प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, पुसेगाव येथे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, आमदार महेश शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस रणजितसिंह देशमुख, पंचायत समिती सदस्या निलादेवी जाधव, माजी बाल कल्याण सभापती वैशालीताई फडतरे यांच्या हस्ते श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस जलाभिषेक करण्यात आला.

तसेच या पाण्याचे कलश भागातील प्रत्येक गावात दिले असून त्याचा ग्रामदैवतास अभिषेक करण्यात येणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

2026-10-08 07:42:29

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

अग्रलेख : आता पाणी वाचवाच!

2026-10-08 06:00:51

अग्रलेख : आता पाणी वाचवाच!

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

2026-10-03 21:39:17

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

2026-10-03 14:53:47

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

2026-10-01 22:19:44

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत