Satara : ‘किसन वीर’च्या ऊसतोडणी, वाहतूक करारांना प्रारंभ

भुईंज : येथील किसन वीर सातारा सहकारी कारखान्याच्या ऊसतोडणी आणि वाहतूक करारास शुक्रवारी प्रारंभ झाला. मदत व पुनर्वसन मंत्री व कारखान्याचे चेअरमन मकरंद पाटील आणि जिल्हा बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची विस्कटलेली घडी बसवण्यात गेल्या तीन वर्षांमध्ये यशस्वी झालो आहोत. 2025-26 च्या गळीत हंगामातही ना. मकरंदआबांना साथ द्यावी, असे आवाहन कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी केले.
सातारा सहकारी शेती औद्योगिक तोडणी व वाहतुक सोसायटीमार्फत कारखाना कार्यस्थळावर अविनाश सावंत, आदिक ढाणे, पंडित शिंदे, सुभाष खेडेकर, नितीन जायकर या ऊसतोडणी, वाहतूक कंत्राटदारांशी प्राथमिक स्वरूपात करार करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमोद शिंदे बोलत होते.
ते म्हणाले, शेतकर्यांच्या उसाला इतर कारखान्यांप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीने आम्ही तोडणी, वाहतूक कंत्राटदार, मशीनमालक, बैलगाडी कंत्राटदारांनाही दर देण्यात कमी पडलो नाही. गेल्या वर्षी व्यवस्थापनाने स्थानिक वाहतूक कंत्राटदारांना भेटून, करार करण्याचे प्रयत्न केले. यामध्ये आम्ही बहुतांशी यशस्वी झालो. 2025-26 च्या गळीत हंगामातही इतर कारखान्यांप्रमाणे तोडणी, वाहतूक कंत्राटदारांना अॅडव्हान्स देण्यात येणार आहे. कंत्राटदारांच्या अडचणींचे निवारणही या हंगामात करण्यात येईल. अडचणीच्या काळामध्ये सर्वांनी मदत केली आहे. यापुढेही वाहतूकदारांनी कराराप्रमाणे वाहने आणून कारखान्यास सहकार्य करावे.
कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी ऊस नोंदीबद्दल माहिती दिली. ज्याच्याकडे जास्त यंत्रणा आहे, तोच कारखाना अधिक गाळप करेल. त्यामुळे तोडणी, वाहतूक कंत्राटदारांनी कारखान्याला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कंत्राटदारांनी आपल्या अडचणी मांडल्या.
यावेळी संचालक हिंदराव तरडे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, खंडाळा कारखान्याचे व्हाइस चेअरमन राजेंद्र तांबे, संचालक चंद्रकांत ढमाळ, बाळासाहेब वीर, तोडणी, वाहतूक संस्थेचे चेअरमन बबनराव साबळे, व्हाइस चेअरमन अजय कदम, मानसिंग साबळे, चंद्रकांत फडतरे, शशिकांत भोईटे, शामराव गायकवाड, बी. आर. सावंत, विश्वास डेरे, शेती अधिकारी शंकर कदम, विठ्ठल कदम, प्रदीप अहिरेकर, विक्रांत फडतरे, गणेश संकपाळ, सुरेश घाटे, किरण सावंत, गणेश पिसाळ, तेजस सावंत, संतोष ढाणे, किशोर जाधव, मोहन डेरे, समीर महांगडे, अमोल शिंदे, शंकर माने, भरत आसबे, संदीप शिंदे, प्रकाश शिंगटे, दत्तात्रय औटे उपस्थित होते.





