मायणी – खटाव तालुक्यातील मायणी गावचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ – जोगेश्वरी वार्षिक रथोत्सव आज सोमवार दि.२ रोजी संपन्न होणार असून त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन नाथ -मारुती देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. उद्या (सोमवार, दि. २ रोजी) सकाळी १० वाजता रथ सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. रथ सोहळ्यात रथपूजन नाथ- मारुती देवस्थान ट्रस्टचे चेअरमन विकास देशमुख यांच्या हस्ते होणार असून यावेळी जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे, यात्रा कमिटीचे चेअरमन डॉ. विकास देशमुख, नाथ- मारुती देवस्थान ट्रस्टचे सर्व विसवस्त, सरपंच सौ. सोनाली माने, उपसरपंच दादासाहेब कचरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रथोत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.