Satara : महापर्यटन महोत्सवासाठी २० कोटीचा खर्च प्रस्तावित
Updated On:

पाचगणी : महाबळेश्वरच्या महापर्यटन महोत्सव काही तासांवर येऊन ठेपला आहे. या महापर्यटन महोत्सवाकरिता २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तशी तरतूद करण्याचा प्रस्ताव पर्यटन संचालनालयाने शासनाकडे दिला असल्याची माहिती संचालनालयाकडून मिळाली.
महापर्यटन महोत्सवाचा उद्देश पर्यटनाबरोबरच स्थानिका व्यावसायिकांच्या उद्योगांना चालना मिळण्याचा आहे. मात्र, या महापर्यटन महोत्सवात स्थानिकाचा सहभाग किती याबाबत कोणतीच स्पष्टता नाही.
पर्यटन संचालनालयाकडून महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव राबवण्यात येत आहे. महाबळेश्वरच्या पर्यटन हंगामात पर्यटकांना आकर्षित करुन घेण्यासाठी विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासन महापर्यटन महोत्सवाच्या यशस्वी करण्याकरीता प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे.





