Satara Pusesavali : चक्री जुगार अड्ड्यांवर पुसेसावळी भागात छापे; 16 जणांवर गुन्हा दाखल
Satara Pusesavali : साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Satara Pusesavali : पुसेसावळी (ता. खटाव) येथे सुरू असलेल्या दोन ठिकाणच्या चक्री जुगार अड्ड्यांवर औंध पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत विविध गावांतील एकूण 16 जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच इलेक्ट्रॉनिक जुगाराचे साहित्य असा सुमारे 3 लाख 48 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Satara Pusesavali : चक्री जुगार अड्ड्यांवर पुसेसावळी भागात छापे; 16 जणांवर गुन्हा दाखल
पहिली कारवाई सायंकाळी 8:30 सुमारास करण्यात आली असून हिंगणगाव येथील सुधीर भगवान कदम हा चक्री जुगार चालवत असल्याचे पोलिसांना आढळले. त्याच्यासह अनेक जण जुगार खेळताना पोलिसांच्या हाती लागले. दुसऱ्या कारवाईत सायंकाळी 6:30 सुमारास येळीव येथील रितेश शिवाजी सर्वगोड हा जुगार चालवताना आढळला. (Satara Pusesavali)
या ठिकाणाहूनही रोख रक्कम, मोबाइल फोन आणि टीव्ही, मॉनिटर, की-बोर्ड, इन्व्हर्टर आदी साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक अनिल शिरोळे आणि सतीश मयेकर तपास करत आहेत. पोलीस उपअधीक्षक रणजित सावंत व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट दिली.





