Satara : मुख्याधिकाऱ्यांची बदनामी केल्याप्रकरणी निदर्शने

सातारा : सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांची विनाकारण बदनामी केल्याच्या निषेधार्थ स्वराज्य कामगार संघटनेने संबंधितांचा पालिकेच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करून संबंधित प्रवृत्तींचा निषेध केला. या प्रकरणाचा निषेध करून कामगारांनी संबंधित गावगुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलीस अधीक्षक समीर शेख यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे विकास करण्याचे काम सातारा पालिकेकडून सुरू आहे. ते काम सर्व प्रक्रियेनुसार सुरू आहे. या कामाचा ठेका देण्यात आला आहे.
त्यावरून दोन गट तयार झाले आहेत. त्यापैकी एका गटाने मुख्याधिकारी बापट यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मुख्याधिकाऱ्यांवर वेडेवाकडे आरोप करणाऱ्यांचा निषेध करत आहोत असे स्वराज्य कामगार संघटनेने पत्रकाद्वारे कळवले आहे.





