Satara : अजित पवार यांच्याविरोधात कोरेगावात आंदोलन

पुसेगाव (प्रतिनिधी)- राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्यावतीने मंगळवारी कोरेगाव शहरातील जुना मोटार स्टॅन्ड येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. तसेच त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. प्रतिमा पायदळी तुडवत होळी करण्यात आली.
भाजपचे तालुकाध्यक्ष संतोषआबा जाधव, माजी जिल्हा उपाध्यक्ष बबनराव कांबळे, जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय काटकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सायली भंडारे, तालुकाध्यक्षा उज्वला बर्गे, तालुका उपाध्यक्ष साधनाताई बर्गे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.
प्रारंभी अजित पवार यांच्या प्रतिमेस बबनराव कांबळे व संजय काटकर यांनी जोडे मारत निषेधाच्या घोषणा दिल्या. अजिता पवार वक्तव्य मागे घेत नाहीत, समाजाची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे भरत मुळे यांनी सांगितले. वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करून भाजप पवार यांना त्यांची निश्चितपणे जागा दाखवून देईल, असा इशारा त्यांनी दिला.
Satara : इतिहास बदलणाऱ्यांनी आम्हाला इतिहास सांगू नये – आमदार शशिकांत शिंदे
भाजपबरोबरच्या आंदोलनात बाळासाहेबांची शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरली असून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले असल्याचे तालुकाप्रमुख संजय काटकर यांनी सांगितले.
प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे म्हणाले की, “”छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आदर्श मानतो, चुकीची वक्तव्य करणाऱ्या अजित पवार यांनी समाजाची जाहीर माफी मागावी.’
माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे, साईप्रसाद बर्गे, सागर वीरकर, ल्हासुर्णे जिल्हा परिषद गटाचे भाजप भाजपचे समन्वयक संदीप केंजळे, चंद्रकांत पवार, भाडळेचे सरपंच सुनील घोरपडे, चंचळीचे सरपंच प्रभाकर गायकवाड, संतोष कदम, उद्धव जाधव, देऊरचे उपसरपंच गणेश कदम, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा पल्लवी बर्गे, सोशल मीडिया तालुकाध्यक्षा सुषमा निकम, सोशल मीडिया शहराध्यक्षा देवकी सावंत, तालुका उपाध्यक्षा वैशाली गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला.





