सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला, तर मंगळवारी (दि. 26) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार 24 नागरिक करोना संक्रमित झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी बुधवारी दिली.
जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना चिंचणेर निंब, ता. सातारा येथील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सातारा तालुक्यात सातारा शहर शनिवार पेठ, गणेश कॉलनी, रामाचा गोट प्रत्येकी एक, इतरत्र दोन, मालगाव, शिंदेवाडी, वनवासवाडी, कोडोली, खेड, भैरवगड प्रत्येकी एक, पाटण तालुक्यात बाचळी एक, फलटण तालुक्यात फलटण शहर एक, वाई तालुक्यातील कळंबे दोन, वाई शहर एक, खटाव तालुक्यात खटाव एक, माण तालुक्यात दहिवडी एक, कोरेगाव तालुक्यात पिंपोडे बुद्रुक, करंजखोप प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यातील शिरवळ, शिंदेवाडी प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्यात पाचगणी एक, इतर एक, असे 24 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.