प्रभात वृत्तसेवा नागठाणे – मी कराड उत्तरचा लोकप्रतिनिधी झालो आणि आठ महिन्यांमध्ये मतदार संघातील सगळ्या पाणी योजना चालू केल्या. गेली ३५ वर्षे कागदावर असणारी चोरे विभागातील इंदोली पाल उपसा सिंचन योजना १०० मीटर हेड करण्यास परवानगी मिळाली. जर मी हे आठ महिन्यात करू शकलो तर मागच्या लोकप्रतिनिधींनी हे पंचवीस वर्ष का केले नाही? हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवायचे पाप केले. ते पाप आम्ही शासनाच्या माध्यमातून धुतले, असे प्रतिपादन आ. मनोज घोरपडे यांनी केले. चोरे येथील नागरी सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुरेशतात्या पाटील, मोहनराव माने निवासराव निकम, महेश बाबा जाधव ,संजय साळुंखे ,रणजीत आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार मनोज घोरपडे म्हणाले, कराड उत्तर मध्ये गेली २५ वर्ष फार मोठ्या प्रमाणात विकासाचा अनुशेष आहे. तो भरून काढण्यासाठी मी काम करत आहे. प्रत्येक गावाला शेतीसाठी पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असून येत्या दोन वर्षांमध्ये कराड उत्तर मधील संपूर्ण दुष्काळ संपुष्टात आणणार आहे. इंदोली व पाल उपसासिंचन योजनाही १०० मीटर हेडवरून १४५ मीटर हेडवर नेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून जंगलवाडी, साखरवाडी ,भगतवाडी या गावांना गावात जाण्यासाठी रस्ता नाही तो रस्ता येत्या एका वर्षामध्ये पूर्ण करणार आहे.भगतवाडी चा रस्ता पूर्णत्वास आलेला आहे. उंब्रज सारख्या मोठ्या शहरांमध्ये उड्डाणपुलाचे काम मार्गी लागले आहे.यावेळी पै. नयन निकम, शहाजी मोहिते, सुनीलनाना काळभोर, प्रशांत भोसले, विकास निकम, संदीप काटे, रामदास बाबर ,संजय साळुंखे ,शरद भोसले (फौजी), अंगद साळुंखे, अक्षय यादव, जयवंतनाना जाधव, बाळासो कांबिरे, गणेश इंजेकर, कृष्णात मोहिते ,सत्यजित काळभोर, संतोष पाटील, राजेश शेळके, नारायण पाटील, जगन्नाथ नेटके, शुभम भिलारे, केदार देटके, सौरभ कवळे, महेश चंदुगडे ,प्रशांत कणसे, सुधीर शेळके, शुभम साळुंखे, प्रमोद यादव, शेखर साळुंखे, दादासो काटे, जालिंदर रामुगडे, सागर साळुंखे, निखिल संकपाळ, ग्रामस्थ महिला व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.