Satara News : परमिट रूममधील तळीरामांची संख्या रोडावली, 40 टक्के महसूलाला फटका

सातारा : राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाने विदेशी दारूवर तब्बल 15 टक्के कर वाढ केल्याने विदेशी दारूच्या किमती प्रतिकॉटर शंभर ते दोनशे रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात परमिट रूम चालकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. येथील दारू परवडत नसल्याने तळीरामाने देशीचा पर्याय शोधत वाईन शॉपचा रस्ता धरला आहे.
शासनाने विदेशी दारूवरील कर वाढ करताना यामधून 14000 कोटी रुपयांची उत्पन्न अपेक्षित धरलेले आहे. पण दरवाढ केल्यानंतर राज्यातील बहुतांश बारमधील विदेशी दारूचा खप 25 ते 40 टक्क्यांनी कमी होतात त्याचा दावा पार चालकांनी केला आहे. सातारा जिल्ह्यातील दीडशेहून अधिक बार चालकांनी दोनच दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करून प्रशासनावर निवेदन सादर केले होते.
या नवीन करवाडीमुळे शासनाचे दारूपासून वाढण्याऐवजी कमी होण्याची आशंका बारचालक व्यक्त करत आहेत. बार चालकांनी या वाढीवकरवाडीला विरोध करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये साधारण अडीचशे हुन अधिक परमिट रूम आणि बियर बार आहेत जिल्ह्याचा महसूल साधारण दीडशे कोटीपेक्षा अधिक आहे.
मात्र राज्य शासनाच्या करवाढीमुळे बनावटी विदेशी दारूच्या किमती शंभर ते दोनशे रुपयांनी वाढलेले आहे ही वाढीव किंमत अगदी गब्बर तळीरामच्या केसाला सुद्धा परवडनाशी झाली आहे त्यामुळे अस्सल तळीराम यांनी आपली रोजची मैखाना मैफलआठवड्याने किंवा पंधरवड्याने करायला सुरुवात केली आहे सध्या ज्यांना परवडते आहे त्यांनी महागडे ब्रँड टाळून स्वस्तातल्या ब्रँडला पसंती द्यायला सुरुवात केली आहे.
बार मधील आखाड पार्टी आणि मित्र मित्रांच्या पार्ट्यायावर दरवाढीच्या मर्यादा पडल्या आहेत काहीजण बारमधील दारू परवडत नसल्याने वाईन शॉप मधून दारूची खरेदी करताना दिसत आहेत या सगळ्यांचा परिणाम म्हणून बार मधील भारतीय बनावटीच्या विदेशी दारूचा कफ 40 टक्क्यांनी कमी होत असल्याचा दावा बारचालकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.
वातानुकूलित यंत्रणा परमिट रूमचा वॅट जीएसटी सर्विस चार्ज अशी गोळा बेरीज करून एखाद्या विशिष्ट ब्रँडची एक क्वार्टर नव्या करवाडीसह साडेपाचशे रुपयापर्यंत जाऊ शकते. इतकी क्रयशक्ती असलेला तळीराम साताऱ्या बोटावरच सापडतो. वाईन शॉपमधून दारू घेऊन साताऱ्यात एकांत सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
या शक्यतेचा धोका कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने वेळीच ओळखायला हवा महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये कर्नाटक आणि गोव्यातील दारूच्या किमती जवळपास निम्म्यावर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दरवाढीचा फटका परमिट रूम चालकांना बसणार आहे. आंतरराज्य दारू तस्करी ला चालना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कोल्हापूर हद्दीवरील हुबळी निपाणी येथे हुबळी मेड आणि गोवा मेड दारूची मोठ्या प्रमाणावर तस्करी चालते सीमा बागाय शासनाचे चेक पोस्ट असूनही येथे तस्करीला आळा बसू शकत नाही.
आखाड पार्टीचा झाला बेरंग
येत्या 25 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे आखाड पार्ट्यांचा माहोल रंगात असताना राज्य शासनाने विदेशी दारूवर लाभलेली करवाढयामुळे सामेश मेजवान्यांवर मर्यादा आल्या आहेत. चिकन, मटण यांचे दर चढ्या भावाने असताना त्यामध्ये ब्रॅण्डेड व्हिस्की सुद्धा सहभागी झाली आहे. दहा टक्के दरवाढ वाईन शॉपवाल्यांना परवडू शकते. मात्र, परमिट रूमचालकांची यामध्ये गोची झाली आहे. अनुज्ञप्ती फी तसेच अनामत रक्कम यामध्येही 25 टक्केपेक्षा अधिक वाढ झाल्याने भविष्यातला परमिट चालकांचा धंदा राज्य शासन बंद करण्याच्या अवस्थेत आहे काय ? अशी शंका परमिट रूमचालकांना भेडसावू लागली आहे.





