Satara News : पाडेगाव येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुटका; वन विभागाच्या अधिकार्यांनी सोडले नैसर्गिक अधिवासात
फलटण तालुक्यातील पाडेगाव शिवारातील चांभार मळा परिसरातील विहिरीत पडलेल्या (Satara News) कोल्ह्याची वन विभागाच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका करण्यात आली. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Satara News : फलटण तालुक्यातील पाडेगाव शिवारातील चांभार मळा परिसरातील विहिरीत पडलेल्या (Satara News) कोल्ह्याची वन विभागाच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका करण्यात आली. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाडेगाव येथील शेतकरी राहुल शिंदे हे गुरुवारी सकाळी शेतातील (Satara News) विहिरीवरील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले असता, त्यांना विहिरीमध्ये कोल्हा पडलेला दिसला.
ही विहीर सिमेंट रिंगने बांधलेली असल्याने, कोल्ह्याला बाहेर पडणे अशक्य झाले होते. रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात फिरत असताना, तो विहिरीत पडला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक सातारा अमोल सातपुते, सहाय्यक उपवनसंरक्षक दिगंबर जाधव व फलटणच्या (Satara News) वनक्षेत्रपाल निकिता बोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल महादेव पाटील, वनरक्षक देवकी तहसीलदार, बचाव पथकातील मंगेश कर्वे, सचिन जाधव, गणेश गुळवे, फलटणच्या टीम ग्लोबल अर्थ फाउंडेशन यांनी संयुक्त बचावकार्य राबवले.
त्यांना वनमजूर नितीन गोवेकर व लक्ष्मण भंडलकर यांनी सहकार्य केले. अथक प्रयत्नांनंतर कोल्ह्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढून, त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.






