Satara News : कोयना धरणातून 15,700 क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Updated On:

कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने धरण प्रशासनाने मंगळवार, दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९:३० वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे प्रत्येकी १ फूट ६ इंच उघडले. यामुळे नदीपात्रात १३,६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यासोबतच, धरणाच्या पायथा विद्युतगृहातील दोन्ही युनिटमधून २,१०० क्युसेक पाणी सोडले जात असून, एकूण १५,७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होत आहे.
वाढत्या पाण्याच्या विसर्गामुळे कोयना नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांना नदीकाठच्या परिसरात अनावश्यक फिरणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज घरगुती गणपती विसर्जनाचा दिवस असल्याने पाण्याचा विसर्ग दुपारी ऐवजी रात्री करण्याचा निर्णय कोयना धरण प्रशासनाने घेतला, असे प्रशासनाने स्पष्ट केले.





