Video: कराड तालुक्यातील उंडाळे परिसरात बिबट्याची दहशत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सातारा – उंडाळे (ता. कराड) येथील रयत सहकारी साखर कारखाना रस्त्यावर असणाऱ्या बचपन स्कूलच्या पाठीमागील शिवारात बिबट्या दिसून आला आहे. बिबट्याच्या दहशतीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सातारा: उंडाळे परिसरात बिबट्याची दहशत; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण pic.twitter.com/E5hoaL7Ygx
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) December 27, 2024
या बिबट्याचे दर्शन गेल्या काही दिवसांपासून होत आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. एवढेच नव्हे तर रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा बिबट्या पाठलागही करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. जवळच बचपन स्कूल आहे. त्यामुळे शाळेतील मुलांमध्ये तसेच त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उंडाळे परिसरात बिबट्याच्या वावरामुळे शेतात काम करणारे शेतकरीही भीतीच्या छायेमध्ये आहेत. वनविभागाने बिबट्याचा बदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.





