Satara : कोरेगाव नगरपंचायतीतील नगरसेवक निधी वाटपाची प्रक्रिया तपासून घेणार
Updated On:

कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायतीमध्ये सर्व नगरसेवकांचा निधी वाटप केला गेला पाहिजे. याबाबत आमदार शशिकांत शिंदे यांनी तक्रार उपस्थित केली आहे. निधी वाटपाची प्रक्रिया तपासून घेतली जाईल, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
विधान परिषदेमध्ये मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजता आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव शहराशी निगडित तीन प्रश्न उपस्थित केले त्यावर उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.
कोरेगाव नगरपंचायतीमध्ये विकास कामे करत असताना विरोधी नगरसेवकांवर अन्याय केला जात आहे. स्वच्छता अभियानामध्ये देखील या नगरसेवकांना सहभागी करून घेतले जात नाही.
त्याचबरोबर शहरातील अतिक्रमणे हटविताना दुजाभाव केला जात आहे, असा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.




