Satara : जिल्ह्यात जलजीवन मिशनचे 15 प्रस्तावच मंजुरीसाठी

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे .केवळ पंधरा टक्केच प्रस्ताव मंजुरीसाठी आले आहेत यामुळे या योजनेची संपूर्णपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. या बैठकीमध्ये त्यांनी या योजनेच्या कामाची पोलखोल केली.
जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीच्या इमारती झाली. या बैठकीत 647 कोटी जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यावर चर्चा करण्यात आली यामध्ये अनुसूचित जाती उपयोजना 95 कोटी आदिवासी उपाय योजना बाह्य क्षेत्र दोन कोटी आठ लाख असे 744 कोटी आठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे शशिकांत माळी यांनी सांगितले.
मात्र, जल जीवन मिशन योजनेच्या संदर्भात जोरदार चर्चा झाली. जलजीवन मिशनची कामे जिल्ह्यात अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला. केवळ पंधरा टक्केच प्रस्ताव त्यामुळे मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेच्या कामाची सखोल चौकशी करून त्याचा विस्तृत अहवाल मांडला जावा, अशी मागणी शिंदे यांनी जोरकसपणे केल्यानंतर या मीटिंगमध्ये जलजीवनचा मुद्दा गाजला.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी यावेळेस साकव पूल बांधणे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र माझी शाळा इत्यादी उपक्रमांसाठी जास्तीचा निधी ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.





