सातारा – खंडाळा पोलिसांची दारू अड्ड्यांवर कारवाई
Updated On:

खंडाळा – खंडाळा शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केलेल्या मागणीनंतर खंडाळा पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. खंडाळा व पारगाव येथील दोन दारू अड्ड्यांवर कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडाळा येथे महावितरण कार्यालयाच्या मागे घराच्या आडोशाला देशी दारू विकणार्या भरत जयवंत खंडागळे (वय 45, रा. खंडाळा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारगाव येथे शिंदे गॅरेजजवळच्या शेडमध्ये देशी दारूची विकणार्या प्रवीण दिलीप ढमाळ (वय 32, रा. असवली, ता.खंडाळा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.





