सातारा – कण्हेर धरणातून आज बारा वाजता पाणी सोडणार
Updated On:

सातारा – कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आज दि. २५ जुलै रोजी मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी १२ वाजता धरणाची वक्र दरवाजे उचलून सांडव्यावरून 5000 क्यूसेक विसर्ग सुरू करणेत येणार आहे. आवक वाढेल त्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे..
त्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदी तीरावरील गावातील नागरिकांनी आपल्या पशुधनासह नदी पात्रात जाऊ नये कण्हेर धरणमधून वेण्णा नदी पाणी सोडल्यामुळे १. म्हसवे पूल- करंजेकडून म्हसवेकडे जाणारा पूल २. हमदाबाज पूल- हमदाबाजकडून किडगाव कडे जाणारा पूल हे पूल पाण्याखाली जाणार आहेत. त्यामुळे या पुलांवरुन कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.





