Satara News : जलसंपदा विभागाच्या पुनर्रचनेचा नवा आराखडा; सातारा जिल्ह्यातील सिंचन कार्यालयांची पुनर्रचना शक्य
Satara News :
Updated On:

Satara News : कोयनानगर प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून सिंचन यंत्रणेच्या पुनर्रचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
या आराखड्यानुसार सातारा जिल्ह्यातील सिंचन विभागातील काही कार्यालयांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. सातारा सिंचन मंडळासह धोम कालवा विभाग आणि 13 उपविभाग बंद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पुणे येथील मुख्य अभियंता कार्यालयाच्या अखत्यारीत सातारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, कालवे व पाणी व्यवस्थापनाशी संबंधित कामकाज केले जाते. मात्र, पुनर्रचना आराखड्यानुसार काही कार्यालये बंद करून, त्यांचे कामकाज इतर विभागांकडे वर्ग करण्याचा विचार सुरू आहे.





