सातारा : इको सेन्सिटिव्ह बामणोलीमध्ये ठेकेदार तोडतोय ‘निसर्गाचे लचके’; कारवाई कधी होणार?

Updated On:
सातारा : इको सेन्सिटिव्ह बामणोलीमध्ये ठेकेदार तोडतोय ‘निसर्गाचे लचके’; कारवाई कधी होणार?

पाचगणी – निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोयनेच्या जलाशयालगत बामणोली व तेटली रस्त्याच्या (ता. जावळी) दरम्यान पुनर्वसन कामाचा ठेका घेणारा ठेकेदार ब्लास्टिंगच्या सहाय्याने डोंगराचे बेकायदा उत्खनन करत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरु आहे. तहसीलदारांनी याबाबत पंचनाम्याचे आदेश दिले असताना फक्त जुजबी कारवाई करुन डोंगराचे लचके तोडणाऱ्यांना धनदाडग्यांना सोडल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

कोयना पुनवर्सनाच्या माध्यमातून बामणोली भागामध्ये ठेकेदार काम करत आहेत. मात्र, काम करताना लागणारे गौण खनिज मात्र नियम वेशीला टांगून डोगरं फोडत आहे. धनदांडग्या ठेकेदाराकडून इकोसेन्सिटिव्ह झोनच्या नियमांचे उल्लंघन करत ब्लास्टिंगमुळे स्थानिकाच्या घरांना तडे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक अधिकाऱ्यांकडून कारवाई न करताच प्रकरण दाबण्याचा प्रकार सुरु आहे.

याबाबत जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी सर्कल मदने यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले असताना देखील कारवाईला टाळाटाळ होत आहे. यासंदर्भात तहसीलदारांशी संपर्क साधला असता आदेश देऊनही कारवाई न करणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

आणखी संबंधित बातम्या

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

2026-10-08 07:42:29

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

Gen Z Parenting: 'मुलं बिघडली' की आपण पालक म्हणून हरलो? साताऱ्यातील धक्कादायक घटनेनंतर उपस्थित झाले मोठे प्रश्न

2026-10-06 00:30:51

Gen Z Parenting: 'मुलं बिघडली' की आपण पालक म्हणून हरलो? साताऱ्यातील धक्कादायक घटनेनंतर उपस्थित झाले मोठे प्रश्न

Satara DCC Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोडी! ५ ऑक्टोबरला कुणाचा अर्ज बाद होणार? महायुतीचा ठरला 'हा' प्लॅन

2026-10-05 00:30:02

Satara DCC Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोडी! ५ ऑक्टोबरला कुणाचा अर्ज बाद होणार? महायुतीचा ठरला 'हा' प्लॅन

Nhalewadi Leopard Attack: मदत नको, बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा! चिमुकल्याच्या मृत्यूनंतर संताप; ग्रामस्थांची जलमंदिर पॅलेसवर धाव

2026-10-05 00:15:23

Nhalewadi Leopard Attack: मदत नको, बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा! चिमुकल्याच्या मृत्यूनंतर संताप; ग्रामस्थांची जलमंदिर पॅलेसवर धाव

Satara News : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; साताऱ्यातील घटनेने हळहळ

2026-10-04 08:21:59

Satara News : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; साताऱ्यातील घटनेने हळहळ