Satara : औंधच्या येथील मुलामुलींच्या वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु

औंध : औंध येथील शासनमान्य वसतिगृहात मागासवर्गीय मुलामुलींना मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष यशवंत सोनवणे यांनी दिली.
येथील विकास अभियान संस्थेमार्फत समाजकल्याण विभागाच्या नियमानुसार इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी मुलामुलींचे वसतिगृह चालविले जाते. यामध्ये आरक्षणानुसार मुलामुलींना मोफत प्रवेश दिले जातात.
अनुसूचित जातीसाठी साठ टक्के, अनुसूचित जमाती पंधरा टक्के, विमुक्त जाती जमातीसाठी तेवीस टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के, इतर मागास प्रवर्गासाठी पंधरा टक्के, आर्थिक मागास प्रवर्गासाठी पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे.
या आरक्षनुसार मुलामुलींना वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची मोफत भोजन निवासाची सोय केली जाणार आहे. मुलामुलींसाठी प्रत्येकी चोवीस जागा आहेत. पालकांनी त्वरित संपर्क साधून वसतिगृहात प्रवेश घ्यावेत, असे आवाहन वसतिगृह अधीक्षक धनंजय सादिगले यांनी केले आहे.





