Satara : वर्धनगड घाटामध्ये भीषण अपघात; दोन जण गंभीर जखमी

Updated On:

पुसेगाव  (प्रतिनिधी) – वर्धनगड घाटामध्ये ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली व मक्याने भरलेला ट्रक यांची समोरासमोर भीषण धडक झाल्याने दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. दोन्ही वाहन चालकांना सातारच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम कोरेगाव पोलिसांच्यावतीने करण्यात येत आहे.

रामोशीवाडीनजीक वर्धनगड घाटाच्या पहिल्याच वळणावर कोरेगावकडून पुसेगावकडे जाणारी ऊसाची ट्रॅक्टर ट्रॉली व पुसेगावकडून कोरेगावकडे जाणारा मका भरलेला ट्रक या दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने तो ट्रॅक्टरवर जाऊन जोरदार धडकला. त्यामध्ये ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला.

ट्रकचालक ड्रायव्हिंग सीटवर स्टेरिंग व पत्र्यामध्ये अडकून बसला होता. येथील सरपंच केशव मदने तसेच सादिक शिकलगारसह रामोशीवाडी व वर्धनगड तरुणांच्या मदतीने पत्रा तोडून चालकाला बाहेर काढण्यात आले तर ऊस ट्रॉलीचा चालक मक्याच्या पोत्याखाली अडकून पडला होता. त्यालाही ग्रामस्थांनी तातडीने काढले.

वाचाळवीरांना आवरा, मंत्री लोढांच्या वक्तव्यावरुन अजित पवार भडकले; म्हणाले ” हे कधी… “

दोन्ही चालकांना सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. वाहतूकसुमारे दोन तास जाम झाली होती. दोन्ही चालकांचीची नावे कळू शकली नाहीत. सदर या ठिकाणी कोरेगाव व पुसेगाव पोलीस ठाण्यांचे पोलीस उपस्थित होते. कोरेगाव पोलिस तपास करतआहेत.

आणखी संबंधित बातम्या

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

2026-10-08 07:42:29

Satara: स्वीकृत नगरसेवक शंकर माळवदे यांचा राजीनामा

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

2026-10-03 21:39:17

Satara News : धक्कादायक ! जुन्या वैमनस्यातून शेंद्रेमध्ये युवकाचा निर्घृण खून

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

2026-10-03 14:53:47

Satara News: सातारा तालुका पोलिसांचा दोषसिद्धीचा दमदार ठसा; जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

2026-10-01 22:19:44

Satara News : सातारा पोलिसांची धडक कारवाई ! CEIR पोर्टलद्वारे १.५ कोटींचे ४४९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत; नागरिकांना केले परत

Satara: उत्तम नियोजनामुळे अजिंक्यतारा सूतगिरणीची प्रगती; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले

2026-09-30 08:07:55

Satara: उत्तम नियोजनामुळे अजिंक्यतारा सूतगिरणीची प्रगती; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले