Satara Farmer Loan: कर्जमाफीची यादी प्रसिद्ध! जिल्ह्यातील ३१ हजारांहून अधिक शेतकरी पात्र; लगेच करा ‘हे’ महत्त्वाचे काम
Satara Farmer Loan: कर्जमुक्तीचा निधी थेट बँक खात्यात मिळवण्यासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक; तक्रारींसाठी ऑनलाइन नोंदणी सुविधा उपलब्ध.

Satara Farmer Loan – पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील सातारा जिल्ह्यातील पात्र शेतकर्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार 206 गावांमधील 31 हजार 556 शेतकरी पात्र ठरले असून, संबंधित गावांमध्ये याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या शेतकर्यांनी ई-केवायसी तातडीने करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संजयकुमार सुद्रिक यांनी केले आहे.
शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड केल्यानंतर, पडताळणी करून पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा बँककडील 41 हजार 421 आणि राष्ट्रियीकृत व कमर्शियल बँकांकडील 11 हजार 201 शेतकर्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. कर्जमुक्तीचा लाभ थेट बँक खात्यांमध्ये जमा होण्यासाठी पात्र शेतकर्यांना बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. (Satara Farmer Loan)
शेतकरी आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये आधार प्रमाणीकरण करून, कर्जखात्यांची पडताळणी करू शकतात. आतापर्यंत 63 टक्के शेतकर्यांची ई-केवायसी झाली आहे. उर्वरित शेतकर्यांनी विनाविलंब आपले सरकार सेवा केंद्रांमद्ये जाऊन ई-केवायसी करावी. ई-केवायसी करताना आधार किंवा कर्जखात्याच्या माहितीत तफावत आढळल्यास,
सेवा केंद्रांमधून ऑनलाइन तक्रार दाखल करता येईल. या तक्रारींचे निवारण जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. योजनेच्या लाभासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे. ज्या शेतकर्यांनी ही नोंदणी अद्याप केलेली नाही, त्यांनी ई-केवायसीबरोबच नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सुद्रिक यांनी केले आहे.





