पारनेर – निघोज परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे.मंगळवारी हॉटेल जत्राचे मालक व हॉटेल कामगार यांच्यावर पठारवाडी येथील आदिनाथ मच्छिंद्र पठारे, विशाल खंडू पठारे, शंकर केरू पठारे, धोंड्या जाधव, प्रथमेश सोनवणे यांनी जेवणाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेश भूकन यांनी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. निघोज ते देवीभोयरे रोडच्या कडेला सोनवणे वस्ती समोर जत्रा नावाचे हॉटेल असून, दि.२ रोजी रात्री अकराच्या सुमारास पठारवाडी येथील आदिनाथ मच्छिंद्र पठारे, विशाल खंडू पठारे व शंकर केरू पठारे आले. त्यांनी जेवणाची मागणी केली म्हणून भाचा ओंकार अंकुश रसाळ हा त्यांना अकरा वाजलेत हॉटेल बंद झाले, असे सांगितले. आदिनाथ पठारे यांनी तुला जेवण द्यावेच लागेल नाहीतर मी राडा करेन असे धमकावले. त्यानंतर जेवण करत असताना आदिनाथ याने जेवण व्यवस्थित नाही, असे म्हणून शिव्या देण्यास सुरुवात केली. भाऊ प्रवीण याने बिल देऊ नका अशी समजूत काढून त्यांना हॉटेलच्या बाहेर काढून दिले. त्यानंतर भाऊ प्रवीण, भाचा ओंकार, हॉटेलमधील कामगार असे सर्व हॉटेलमध्ये असताना रात्री ११.५५ हॉटेलमध्ये अचानक आदिनाथ पठारे , धोंड्या जाधव , शंकर पठारे , विशाल पठारे ,प्रथमेश सोनवणे आले. हातावर मानेवर ,पायावर ,मांडीवर कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण केली. तलवारीचा गंभीर घाव प्रवीणच्या दोन्ही हातावर बसून हाताला गंभीर जखम झाली.हॉटेलमधील एलईडी टीव्ही ,लॅपटॉप काउंटर ,लॅपटॉपची वायरिंग तोडून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केले. प्रविण यास जबर मार लागल्याने पुढील उपचारासाठी नगर येथे खासगी हॉस्पिटल येथे आणून उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.