साडी, नथ अन् गजरा..; मराठमोळ्या ‘सई’चा नववारीतला नखरा पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

Updated On:
Photo 1

मुंबई – आपल्या दिलखेच अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे मराठमोळी अभिनेत्री ‘सई ताम्हणकर’ मराठी रसिकांच्या दिलों की धडकन बनली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या ‘सई ताम्हणकर’कडे पाहिलं जातं.

विविध धाटणीच्या भूमिका साकारत सईने आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठीच नव्हे तर सईने हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय हे सुद्धा सई तिच्या चाहत्यांना सांगत असते.

नुकताच सईने आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहे. यामध्ये निळ्या रंगाची साडी, हिरव्या बांगड्यास गजरा आणि नथ अशा लूकमधील फोटो सईनं शेअर केले आहेत.

‘सालस’ असं कॅप्शन सईनं या फोटोला दिलं आहे. सईनं या फोटोला ‘अस्सल . . .’ असंही कॅप्शन दिलं आहे. सध्या सईच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून, फॅन्स देखील लाडक्या सईच्या फोटोंवर कमेंटचा वर्षाव करत आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना