Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी अन् तनुश्री दत्ता भावुक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
Tanushree Dutta Reaction On Nana Patekar तनुश्री दत्ता सध्या कामानिमित्त लखनऊमध्ये आहेत. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली. एका कार्यक्रमासाठी त्या लखनऊला पोहोचल्या असून, आधीच ठरल्याप्रमाणे दिवसभर सोशल मीडियावर लाईव्ह येण्याचा आणि विविध कंटेंट शेअर करण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर परिस्थिती बदलली.

Tanushree Dutta Reaction On Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, सध्या आपल्याला या परिस्थितीत नेमकं काय बोलावं, हे समजत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तनुश्री दत्ता सध्या कामानिमित्त लखनऊमध्ये आहेत. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली. एका कार्यक्रमासाठी त्या लखनऊला पोहोचल्या असून, आधीच ठरल्याप्रमाणे दिवसभर सोशल मीडियावर लाईव्ह येण्याचा आणि विविध कंटेंट शेअर करण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर परिस्थिती बदलली.
या बातमीमुळे आपण भावुक झाल्याचं तनुश्री यांनी सांगितलं. नाना पाटेकर यांच्या निधनावर नेमकी कशी प्रतिक्रिया द्यावी, हे सध्या आपल्याला समजत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे लगेच कोणतंही वक्तव्य करण्याऐवजी आधी परिस्थिती समजून घेणं पसंत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
“जेव्हा मला समजेल की कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यायची आहे, तेव्हा मी नक्की बोलेन,” अशा आशयाची भावना तनुश्री यांनी व्यक्त केली. यासोबतच त्यांनी नाना पाटेकर यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. सध्या आपल्याकडून कुटुंबीयांसाठी केवळ संवेदना असल्याचं त्यांनी सांगितलं.
तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांचं नाव यापूर्वीही चर्चेत आलं होतं. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांमध्ये झालेल्या वादामुळे हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं होतं. त्यामुळे नाना पाटेकर यांच्या निधनानंतर तनुश्री दत्ता नेमकी काय प्रतिक्रिया देतात, याकडे अनेकांचं लक्ष होतं.
View this post on Instagram
दरम्यान, नाना पाटेकर यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनी नाना पाटेकर यांना भारतीय सिनेमातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक असल्याचं म्हटलं. त्यांच्या अभिनयातील ताकद, प्रभाव आणि वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची क्षमता याचं करण जोहर यांनी कौतुक केलं.
अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनीही नाना पाटेकर यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. त्यांनी नाना यांचा फोटो शेअर करत त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. नाना हे उत्तम कलाकार आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असल्याचं माधुरी यांनी म्हटलं. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीने एक अनमोल आणि दिग्गज कलाकार गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर वेगळी छाप सोडली. त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर अनेक कलाकार, चाहते आणि सिनेसृष्टीतील व्यक्ती त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अशा वेळी तनुश्री दत्ता यांनीही भावुक होत कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली असून, योग्य वेळ आल्यावर याबाबत आपली भूमिका मांडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.





