CSK vs PBKS : ९७ नंबरचं गुपित अन् दोन भावांचं युद्ध! IPLच्या मैदानात खान ब्रदर्स भिडणार; वडिलांनी कोणाची बाजू घेतली? पाहा VIDEO
CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात होणारा सामना केवळ दोन संघांमधील लढत नसून एकाच घरातील दोन भावांमधील 'हाय-व्होल्टेज' युद्ध ठरणार आहे.

CSK vs PBKS IPL 2026 Sarfaraz Khan vs Musheer Khan : आयपीएल २०२६ च्या सातवा सामना आज सीएसके आणि पंजाब किंग्स यांच्यात होणारा आहे. हा सामना केवळ दोन संघांमधील लढत नसून एकाच घरातील दोन भावांमधील ‘हाय-व्होल्टेज’ युद्ध ठरणार आहे. चेन्नईचा सर्फराझ खान आणि पंजाबचा मुशीर खान हे दोन सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध उभे ठाकले असून, त्यांचे वडील नौशाद खान यांच्यासाठी हा क्षण खूप खास असणार आहे.
कोणाला करणारा सपोर्ट?
चेपॉक स्टेडियमवर शुक्रवारी जेव्हा चेन्नई आणि पंजाबचे संघ भिडतील, तेव्हा स्टँड्समध्ये बसलेले नौशाद खान सर्वांचे लक्ष वेधून घेतील. एका बाजूला मोठा मुलगा सर्फराझ आणि दुसरीकडे धाकटा मुशीर, अशा कात्रीत सापडलेल्या पित्याने कोणाला पाठिंबा द्यावा, यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. नौशाद यांनी अंगावर चेन्नईची ‘पिवळी जर्सी’ चढवली आहे, तर डोक्यावर पंजाबची ‘लाल टोपी’ घातली आहे. “माझ्यासाठी दोन्ही मुलं सारखीच आहेत, कोणालाही नाराज करू शकत नाही,” असे म्हणत त्यांनी आपल्या दोन्ही पोरांना ‘ऑल द बेस्ट’ म्हटले आहे.
जर्सी नंबर ९७ मधील खास रहस्य –
Proud dad, proudest moment! ✨
Go well, Sarfaraz! 💛 #WhistlePodu #CSKvPBKS pic.twitter.com/SCrIWwb7vM— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 3, 2026
चेन्नई सुपर किंग्सने शेअर केलेल्या एका हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये सर्फराझ आपल्या वडिलांना ९७ नंबरची खास जर्सी भेट देताना दिसत आहे. या नंबरमागचे गुपित सांगताना सर्फराझ म्हणाला की, हिंदीमध्ये ९ (नौ) आणि ७ (सात) एकत्र वाचल्यास ते ‘नौशाद’ (वडिलांचे नाव) असे ऐकू येते. हा योगायोग वडिलांना खूप भावला. वडिलांनी मोठ्या मुलाचे कौतुक केले असले तरी, पंजाब किंग्सने शेअर केलेल्या व्हिडिओत ते धाकटा मुलगा मुशीरच्या सरावावरही बारीक लक्ष ठेवताना दिसत आहेत.
अनुभव विरुद्ध उत्साह –
When your biggest supporter is in the stands! ❤️ pic.twitter.com/XtJUZLNh7h
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 3, 2026
सर्फराझ खानकडे ५१ आयपीएल सामन्यांचा अनुभव असून त्याने १३०.८६ च्या स्ट्राईक रेटने ६०२ धावा केल्या आहेत. दुसरीकडे, मुशीर खानने २०२५ मध्ये आपले पदार्पण केले होते, मात्र, त्याला अद्याप खाते उघडता आलेले नाही. यंदा पंजाब त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. एका बाजूला धोनीच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा सर्फराझ आणि दुसऱ्या बाजूला शून्यातून विश्व निर्माण करणारा मुशीर, या दोघांच्या लढतीत ‘कोणाचा’ विजय होतो, यापेक्षा ‘वडिलांचा’ आनंद गगनात मावेनासा झाला आहे.





