IND vs BAN : मोठा बातमी! हिंदूंच्या नरसंहारानंतरही भारत बांगलादेशात क्रिकेट खेळणार? मालिकेचे वेळापत्रक जाहीर

IND vs BAN Series Schedule Announce : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) २०२६ सालासाठीचे आपले संपूर्ण क्रिकेट कॅलेंडर जाहीर केले असून, यामध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या बांगलादेश दौऱ्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. या वेळापत्रकानुसार, भारतीय संघ ऑगस्ट–सप्टेंबर २०२६ मध्ये बांगलादेशचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांमधे तीन एकदिवसीय (ODI) आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल.
२०२५ च्या स्थगित दौऱ्याची कसर भरून काढणार –
हा दौरा २०२५ मध्ये नियोजित असलेल्या भारतीय संघाच्या बांगलादेश दौऱ्याची जागा घेणार आहे. २०२५ मध्ये राजकीय तणाव आणि अन्य सुरक्षा कारणांमुळे हा दौरा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. त्यावेळी बांगलादेशमधील राजकीय अस्थिरता आणि सुरक्षेबाबत बीसीसीआयने (BCCI) चिंता व्यक्त केली होती.
भारतात विरोधाचा सूर: आयपीएल आणि मुस्तफिजुर रहमान वादाच्या केंद्रस्थानी
The Bangladesh Cricket Board has announced the itinerary for the white-ball series against India
ODIs: September 1, 3, 6
T20Is: September 9, 12, 13 #2026CricketCalendar pic.twitter.com/CIDvTZo5eC— Cricbuzz (@cricbuzz) January 2, 2026
भारतीय संघाच्या या दौऱ्याची घोषणा अशा वेळी झाली आहे, जेव्हा भारतात बांगलादेशबाबत काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. विशेषतः आयपीएल २०२६ साठी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघात स्थान दिल्याने विरोधाला धार चढली आहे.
काही संघटनांनी सध्याच्या परिस्थितीत बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये स्थान देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. मात्र, आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत लीग सुरू होण्यापूर्वी कोणत्याही फ्रँचायझीने अशा प्रकारे खेळाडूला करारमुक्त केल्याचे उदाहरण नाही. या वादावर बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
२०२६ भारत-बांगलादेश मालिकेचे संभाव्य वेळापत्रक –
- बीसीबीने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ २८ ऑगस्ट २०२६ रोजी बांगलादेशात दाखल होईल. या सामन्यांची ठिकाणे नंतर जाहीर केली जातील.
- वनडे मालिका: १, ३ आणि ६ सप्टेंबर २०२६
- टी-२० मालिका: ९, १२ आणि १३ सप्टेंबर २०२६





