Sara Ali Khan : “म्हणून मी मुस्लीम असून हिंदू मंदिरात जाते…”; सारा अली खानचा धक्कादायक खुलासा

Sara Ali Khan – अभिनेत्री सारा अली खान ही बॉलिवूडमधील त्या टॅलेंटेड स्टार्सपैकी एक आहे, जिने अल्पावधीतच एक खास ओळख निर्माण केली आहे. सारा बी टाऊनची टॉप राइजिंग स्टार आहे. अभिनयासोबतच साराला प्रवासाचीही खूप आवड आहे. ती अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी आउटिंग करताना दिसते. आणि आपले फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
मात्र, अभिनेत्रीला काहीवेळा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. सारा अली खान ही मुस्लिम धार्मिक अभिनेत्री असून ती अनेकदा हिंदू मंदिरांमध्ये देखील दर्शनासाठी जात असते. याचे व्हिडिओ आणि फोटो ती सर्वांशी शेअर करते.
यावर साराने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. अभिनेत्री म्हणाली की, “मला आधी याबद्दल काहीच समजायचं नाही. शाळेत किंवा आईवडिलांसोबत परदेशात एकत्र फिरायला जातानाही मला नेहमी प्रश्न पडायचा की अमृता सिंह, सैफ पतौडी, सारा सुलताना, इब्राहिम अली खान..
View this post on Instagram
हे सर्व काय चाललंय? आम्ही नेमके कोण आहोत? मला आठवतंय की एकदा मी आईला प्रश्न विचारला होता की मी कोण आहे? तेव्हा तिने मला सांगितलं की तू भारतीय आहेस आणि हे मी कधीच विसरणार नाही.”
“आपलं राष्ट्र धरनिरपेक्ष आहे आणि मला वाटतं की या सर्व संकल्पना, सर्व काही सीमा या लोकांकडून बनवल्या आणि बिघडवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी त्यांचं पालन करत नाही. मी अशा गोष्टींना महत्त्वच देत नाही. लोकांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न करणं हा मूर्खपणा आहे. त्यापेक्षा मी त्याकडे दुर्लक्ष करणं पसंत करते.” असं ती यावेळी म्हणाली.
दरम्यान, सारा अली खान शेवटची ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटात अभिनेता विकी कौशलसोबत दिसली होती. या चित्रपटात दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगले कलेक्शन केले होते.





