‘हिरोपंती-2’ मधून सारा अली खान बाहेर

मुंबई – टायगर श्रॉफच्या “हिरोपंती-2’ची घोषणा झाली आहे. या सिनेमात तारा सुतारिया लीड रोलमध्ये दिसणार आहे, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. या लीड रोलसाठी आगोदर सारा अली खानचे नाव निश्चित झाले होते.
मात्र, अगदी ऐनवेळी तिच्या हातातून हा प्रोजेक्ट निसटला आहे. साराने फारच थोड्या वेळात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. म्हणूनच तिला “हिरोपंती-2’साठी पहिली पसंती दिली गेली होती.
सारा आणि टायगर श्रॉफची जोडी पडद्यावर पहिल्यांदाच झळकणार होती. साराबरोबरची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये पोचली होती. मात्र, त्याचवेळी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणातून ड्रग्जशी संबंधित असल्याच्या निमित्ताने साराचे नाव रडारवर आले.
या प्रकरणी अनेक सेलिब्रिटीजची नावे रडारवर आली आहेत. अनेकांची चौकशी सुरू झाली. सारा वादग्रस्त ऍक्टर असल्याची चर्चा व्हायला लागली, त्यामुळे निर्मात्यांनी तिला या सिनेमातून वगळण्याचा निर्णय घेतला.
अर्थात तपासादरम्यान ताराला क्लिन चीट मिळाली, पण तिच्या हातून “हिरोपंती-2′ सारखा चांगला सिनेमा मात्र सुटला होता. “हिरोपंती-2’चे शूटिंग लवकरच यूएईमध्ये सुरू होणार आहे. तर दुसरीकडे साराचा “कुली नं 1′ 25 डिसेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.





