सान्या मल्होत्रा आणि सितार वादक ऋषभ शर्माच्या रंगल्या डेटींगच्या चर्चा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Sanya Malhotra And Rishab Sharma | बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा आणि गायिका सुनिधी चौहानच्या ‘आँख’ या म्युझिक व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यानंतर आता सान्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. सान्या लोकप्रिय सतारवादक ऋषभ रिखीराम शर्माला डेट करत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने दोघांच्या डेटींगच्या चर्चांनी जोर धरला आहे.
अलीकडेच, सान्या आणि ऋषभचे काही फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये दोघे एका कार्यक्रमात एकत्र दिसत आहेत. एका फोटोत ते गाडीबाहेर उभे असताना दिसले, तर दुसऱ्या फोटोत दोघांनी एकाच कार्यक्रमात एकाच व्यक्तीसोबत वेगळे फोटो काढले.
यामुळे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज लावला जात आहे. फोटोमध्ये सान्या क्रीम कलरच्या अनारकली सूटमध्ये दिसत आहे, तर ऋषभ ग्रे कुर्ता आणि पांढऱ्या चुरीदारमध्ये दिसत आहे. या दोघांची केमिस्ट्री अनेकांना आवडली आहे. Sanya Malhotra And Rishab Sharma |
कोण आहे ऋषभ रिखीराम शर्मा?
ऋषभ रिखीराम शर्मा हा एक सतारवादक आणि संगीतकार आहे. त्याचा जन्म रिखीराम कुटुंबात झाला, जे कुटुंब कुशल लुथियर्स (गिटार व्हायोलिनसारखी वाद्ये बनवणारे शिल्पकार) म्हणून ओळखले जाते. याशिवाय ऋषभ हा दिवंगत सतारवादक पंडित रविशंकर यांचा शिष्य आहे. Sanya Malhotra And Rishab Sharma |
सान्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती आगामी ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या चित्रपटात दिसणार आहे. १८ एप्रिल २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शशांक खेतान दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. वरुण धवन, जान्हवी कपूर आणि रोहित सराफ हे या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. Sanya Malhotra And Rishab Sharma |
हेही वाचा:






