Takaal Virus Buldhana : शेगाव तालुक्यातील ‘या’ गावातील लोकं अचानक झाले टकले; तपासणीतून ‘ही’ माहिती आली समोर, कारण काय?

शेगावः चीनमध्ये पुन्हा एकदा एचएमपीव्ही या व्हायरसने डोकं वर काढलं आहे. या व्हायरसने चीनमध्ये असलेल्या वुहान शहरातील रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णालयात देखील दाखल होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे बातम्यामधून समजत आहे. भारतात देखील एचएमपीव्ही या व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. या व्हायरसबद्दल लोकांनमध्ये भीतीचे वातावरण असतानाच आता बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे ग्रामस्थांच्या डोक्याला अचानक टक्कल पडू लागल्याने हा कोणता नवा व्हायरस आला आहे का अशी भीती त्यांच्या मनात बसली आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांमध्ये एकप्रकाची भीती तयार झाली आहे. पण आता टक्कल पडण्यामागचे कारण समोर आले आहे.
सर्वेक्षणातून माहिती समोर
या प्रकाराची गांभीर्याने दखल राज्य सरकारने घेतली असून, आरोग्य विभागाकडून येथे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्याली बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. तर पाण्याची पातळीही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याची तपासणी केल्यानंतर समोर आलं आहे. त्यामुळे गावात राहणाऱ्या ग्रामस्थांची केस गळती होत होती. पाण्यात नायट्रेट सारख्या विषारी घटक आढळला असून ते पाणी वापरण्यायोग्य नसल्याचे समोर आलं आहे
शेगाव येथील बोंडगाव आणि खातखेड येथील ग्रामस्थांच्या डोक्यावरचे केस अचानक जाऊ लागले आणि तीनच दिवसातच डोक्याला टक्कल पडले. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि लोकांमध्ये पुन्हा एकदा नव्या व्हायरसची चर्चा सुरू झाली. मात्र, या बातमीची गांभीर्यांने दखल घेत आरोग्य विभागाने शेगाव तालुक्यातील या गावांत घरोघरी जात सर्वेक्षण केले.
फंगल इन्फेक्शनचा हा प्रकार असल्याचे प्रथमदर्शीनी मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. पाण्याची तपासणी नमुने पाठवण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून याची माहिती आल्यानंतर केस गळण्याचे नेमके कारण समोर येईल. मात्र, शेगांव तालुक्यातील टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता 51 वर पोहोचली आहे. यामध्ये गावातील तरुण, वयोरुद्ध व्यक्ती आणि महिलांचाही समावेश आहे.





