Santosh Trophy 2024 (Football) : जम्मू-काश्मीर, मणिपूर उपांत्यपूर्व फेरीत…
Updated On:

Santosh Trophy Sr. national football championship 2024 : जम्मू काश्मीर, मणिपूर संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना नामविताना वरिष्ठ पुरुष गटाच्या संतोष राष्ट्रीय करंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्ण फेरीत धडक मारली. जम्मू काश्मीर संघाने राजस्थानला १-० असे पराभूत केले.
जम्मू संघाच्या अदनान आयुबने ७४ व्या मिनिटाला गोल करताना संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर राजस्थानच्या खेळाडूंनी प्रयत्न करून देखील त्यांना जम्मू-काश्मीरचा बचाव भेदण्यात अपयश आले.
IND W vs WI W 2nd ODI : टीम इंडियानं विंडीजचा 115 धावांनी उडवला धुव्वा, मालिकेतही घेतली अजेय आघाडी..
दुसऱ्या लढतीत मणिपूर संघाने यजमान तेलंगणाला ३-१ ते पराभूत करताना उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. गटवारीत मणिपूर दुसऱ्या स्थानी तर जम्मू काश्मीरने चौथे स्थान निश्चित केले आहे.





