संत सेवालाल महाराज यांनी मानवतावादी संदेश दिला – रामभाऊ दाभाडे

वाघोली – थोर संत सेवालाल महाराजांनी जनमानसात मानवतावादी संदेश दिला. याशिवाय सामाजिक व धार्मिक क्षेत्रात नागरिकांना प्रबोधन केले, हे प्रबोधन आजही आदर्शवत असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी केले.
वाघोली तालुका हवेली येथे संत सेवालाल महाराज मित्र मंडळाच्या वतीने संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी दाभाडे बोलत होते.
या कार्यक्रम प्रसंगी माजी उपसरपंच कैलास सातव पाटील, माजी उपसरपंच शांताराम कटके, माजी उपसरपंच रामकृष्ण सातव पाटील, माजी उपसरपंच संजय सातव पाटील, पप्पू जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके, हवेली तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अनिल सातव पाटील, माजी उपसरपंच समीर भाडळे, सुनील जाधवराव, मुकेश सातव, अबिद शेख ,चंद्रशेखर राठोड, शंकर चव्हाण, बाळू राठोड, सुरेश राठोड, किरण चव्हाण, नायक राठोड, चंद्रशेखर राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.





