Wagholi News : वाघोलीत रामभाऊ दाभाडे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीने साजरा

वाघोली : वाघोली तालुका हवेली येथील पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा माजी ग्रामपंचायत सरपंच रामभाऊ दाभाडे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने गरजू व होतकरू महिलांसाठी शिलाई मशीन व आटा चक्कीचे वाटप करून स्वावलंबनाचा अनोखा आदर्शवत उपक्रम राबविण्यात आला.
वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक दातृत्वाची भावना वृद्धिगत करण्याच्या हेतुने तेजस्विनी सामाजिक संस्था यांच्या वतीने महिलांसाठी शिलाई मशीन व आटाचक्की चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेच्या संपर्कप्रमुख डॉ. सारिका पवार, वाघोलीच्या माजी सरपंच संजीवनी वाघमारे, कुंदा सातव, सारिका घाटे, पंचायत समिती हवेलीचे माजी सदस्य सर्जेराव वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते हिराभाऊ वाघमारे, वाघेश्वर देवस्थानचे राजेंद्र पायगुडे, उद्योजक लखन भाडळे, भारत सातव, गुलाब गायकवाड, प्रमोद भाडळे, संदेश कटके, शैलेश जाधव, गणेश सातव, पोपट दळवी, आदी मान्यवर उपस्थित होते.
रामभाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वाघेश्वर देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील, आव्हाळवाडीचे माजी उपसरपंच संदेश आव्हाळे, उद्योजक विकास शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कटके, पिराजी केकचे संचालक सचिन सातव, वाघोली ग्रामपंचायतचे माजी सदस्य मच्छिंद्र सातव पाटील, बाळा पाटील, उद्योजक रोहित गावडे, स्वप्निल मगर, विनायक दाभाडे, सागर जाधव आदींनी शुभेच्छा देत केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला.





