वाघोली : वाघोली तालुका हवेली येथे पुणे महानगरपालिकेच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठीच्या माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून वाघोलीकरांकडून दाभाडे यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने वाघोली मधील पाण्याचा पुरवठा अल्प असणाऱ्या भागात वाघेश्वर नगर, सुयोग नगर, कोलते पार्क व इतर भागात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दाभाडे यांनी पुणे महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला होता. या भागात पुणे महानगरपालिकेने पाण्याच्या टाक्यापासून त्या पाण्याच्या टाक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली असून वाघोली मधील बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने पाण्याच्या टाक्याद्वारे पाणीपुरवठ्याचा प्रश्न माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी सोडविला आहे. वाघोली मधील नागरिकांच्या मूलभूत गरजा तातडीने सोडवण्यासाठी यापुढील काळात देखील जलद गतीने प्रयत्न करणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. पाण्याच्या टाक्याद्वारे पाणी उपलब्ध होत असलेले नागरिकांमधून पुणे महानगरपालिका व रामभाऊ दाभाडे यांचे आभार मानले जात आहे.