Shevgaon News : मुंगी येथे संत एकनाथ महाराज पालखी दिंडीचे भक्तिभावाने स्वागत
Shevgaon News : श्री क्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे बुधवारी अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आगमन झाले.

Shevgaon News : सुमारे ४२७ वर्षांची अखंड परंपरा असलेल्या श्री क्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे अहिल्यानगर जिल्ह्यात बुधवारी आगमन झाले. संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवरील शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे जिल्हा प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. (Shevgaon News)
यावेळी पालखी सोहळ्याचे चालक नाथ वंशज रघुनाथ बुवा पालखीवाले, ज्ञानेश महाराज गोसावी, योगेश महाराज गोसावी यांचे स्वागत करण्यात आले. शेवगावचे उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार आकाश देहाडदे, गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी पालखीचे स्वागत केले. (Shevgaon News)
याप्रसंगी मंडळाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, मुंगीच्या सरपंच ललिता ढमढेरे, राजेंद्र ढमढेरे, सेवा संस्थेचे चेअरमन गणेश देशमुख, शिवाजी सामिंदर, गुलाब गव्हाणे, गोरख गव्हाणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Shevgaon News)
समता, मानवता, भक्ती आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या संत एकनाथ महाराजांनी अभंग, भारूड आणि ग्रंथरचनेतून समाजाला सदाचाराचा मार्ग दाखविला. गेली ४२७ वर्षे अखंड सुरू असलेली त्यांची पालखी परंपरा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. (Shevgaon News)






