संस्कृती बालगुडे कापलेले केस कॅन्सरग्रस्तांना करणार दान; चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

Sanskruti Balgude | मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासह तिच्या सौंदर्याचे लाखो लोक चाहते आहेत. मात्र आता संस्कृतीचा एक नवा लुक समोर आला आहे. तिने नवा हेअर कट केला आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर देखील शेअर केले होते. हा लुक तिने तिच्या चित्रपटासाठी केल्याचे म्हंटले जात आहे. याबाबत आता संस्कृतीने खुलासा केला आहे.
संस्कृती बालगुडेने सांगितलं की, “नव्या भूमिकेसाठी हेअरकट करणं ही गोष्ट माझ्यासाठी खरंतर खूप धाकधूक होती. मनात कुठेतरी होत की आपल्याला हे झेपणार आहे का ? मी पहिल्यांदाच एवढे शॉर्ट हेअर्स केलेले आहे. खरंतर, हा लूक करताना माझ्या मनामध्ये फार धाकधूक होती. शॉर्ट हेअर सांभाळण्यासाठी किती सोप्पं आहे, हे मला समजलं आहे. मी या नव्या लूकमध्ये फारच वेगळी दिसतेय. मी या लूकमध्ये कशी दिसते हे पाहण्यासाठी मी फारच उत्सुक होते. या लूकमध्ये मी खूपच वेगळे दिसते.” Sanskruti Balgude |
View this post on Instagram
“मी खरंतर हा बॉबकट लूक एका चित्रपटासाठी केला आहे. हा चित्रपट माझ्यासाठी खूपच खास असून या नव्या चित्रपटासाठी मी खूपच उत्सुक आहे. यातून काहीतरी वेगळेपणा तुम्हाला एक प्रेक्षक म्हणून सुद्धा अनुभवता येणार, यात शंका नाही. जेव्हा आम्ही हे फोटोशूट केलं तेव्हा ते खूप वेगळ्या पद्धतीने केलं गेलं जेणेकरून मला स्वतःला मी किती वेगळी दिसते याचा सुद्धा आनंद आणि अनुभव मिळेल’, असे संस्कृती म्हणाली. Sanskruti Balgude |
पुढे ती म्हणाली की, मी कापलेले केस कॅन्सर पेशंटना दान करणार आहे. खरे तर केस कापण्याच्या दोन-तीन दिवस आधी मी इन्स्टाग्रामवर स्क्रोल करत होते तेव्हा काही मुलींनी त्यांचे केस कापून उरलेले केस दान केल्याचे पाहिले. तेव्हा माझ्या मनात हा विचार आला आणि मग मी सुद्धा कॅन्सर पेशंटना आपले केस दान करण्याचा निर्णय घेतला,’ सध्या संस्कृतीच्या निर्णयाचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.
हेही वाचा:
“थोडी जरी नैतिकता असेल तर अमित शाहांचा राजीनामा घ्या”, ठाकरे गटाच्या नेत्याची PM मोदींकडे मागणी





