DC vs RR : संजू सॅमसनने केला खास पराक्रम! केएल राहुलला टाकले मागे

DC vs RR, Sanju Samson surpasses KL Rahul in IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील ३२ वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने ५ गडी गमावून राजस्थानसमोर १८९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान या सामन्यात संजू सॅमसनने केएल राहुलला मागे टाकत एक खास पराक्रम केला आहे.
संजू सॅमसनने केएल राहुलला टाकले मागे –
या सामन्यात नाणेफेकीला उतरताच संजू सॅमसनने सर्वाधिक आयपीएल सामन्यात कर्णधारपद भूषवण्याच्या बाबतीत केएल राहुलला मागे टाकले आहे. यासह आता या यादीत आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. संजू सॅमसनने आतापर्यंत ६५ आयपीएल सामन्यांमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी त्याने ३२ सामने जिंकले आहेत आणि ३१ सामने गमावले आहेत. विशेष म्हणजे तो आतापर्यंत फक्त राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे.
केएल राहुलबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आयपीएलमध्ये ६४ सामन्यांमध्ये त्याच्या संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी संघाने ३१ सामने जिंकले आहेत आणि ३१ सामने गमावले आहेत. दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. तो सध्या कर्णधार नाही पण त्याने किंग्ज इलेव्हन पंजाब आणि एलएसजीचे नेतृत्व केले आहे. आता तो अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. असे म्हटले जाते की दिल्ली त्याला कर्णधार बनवू इच्छित होती, परंतु राहुलने स्वतः नकार दिला आणि त्यानंतर ही जबाबदारी अक्षर पटेलकडे सोपवण्यात आली.
हेही वाचा –DC vs RR : शून्यावर रनआऊट झाल्यानंतर करुण नायरने ड्रेसिंग रूममध्ये काढला राग, VIDEO होतोय व्हायरल
एमएस धोनी पहिल्या क्रमांकावर विराजमान –
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवण्याच्या बाबतीत एमएस धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. तो एकमेव कर्णधार आहे ज्याने २०० हून अधिक सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे आणि १०० हून अधिक सामने जिंकण्यातही यश मिळवले आहे.आता धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत आहे.
हेही वाचा – PBKS vs KKR : ‘काय फालतू फलंदाजी…’, पराभवानंतर श्रेयसशी बोलतानाचा अजिंक्यचा VIDEO व्हायरल
१०० हून अधिक सामन्यांमध्ये फक्त चार खेळाडूंनी केलंय नेतृत्त्वा –
आयपीएलमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणारे फक्त तीन कर्णधार आहेत. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि गौतम गंभीर यांची नावे आहेत. धोनी व्यतिरिक्त, जर आपण या हंगामात ही जबाबदारी पार पाडणाऱ्या सक्रिय कर्णधाराबद्दल बोललो तर त्या यादीत पहिले नाव श्रेयस अय्यरचे आहे, ज्याने आतापर्यंत ७६ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. त्यानंतर संजू सॅमसनचे नाव येते.





