Sanju Samson Hug : नमन पुरस्कार सोहळ्यातील संजू सॅमसन अन् केएल राहुलच्या ‘त्या’ कृतीने जिंकली सर्वांची मन, पाहा VIDEO
Sanju Samson Hug : या कार्यक्रमात चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता केएल राहुल आणि टी-२० विश्वचषक २०२६ चा 'हिरो' संजू सॅमसन यांच्यातील एक अतिशय सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळाली

Sanju Samson Hug to KL Rahul in Naman Awards 2026 : बीसीसीआयने रविवारी दिल्लीत आयोजित केलेल्या नमन अवॉर्ड्समध्ये भारताच्या पाच विश्वविजेत्या संघांचा गौरव केला. या कार्यक्रमात चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता केएल राहुल आणि टी-२० विश्वचषक २०२६ चा ‘हिरो’ संजू सॅमसन यांच्यातील एक अतिशय सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळाली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मैदाबाहेरची ती खास गळाभेट चर्चेत – Sanju Samson Hug
जेव्हा टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला स्टेजवर सन्मानित करण्यासाठी बोलावण्यात आले, तेव्हा संजू सॅमसन स्टेजकडे जात होता. अचानक मागून कुणीतरी ‘संजू’ अशी हाक मारली. संजूने मागे वळून पाहिले असता, तिथे केएल राहुल उभा होता आणि तो टाळ्या वाजवून आपल्या सहकाऱ्याचे अभिनंदन करत होता. राहुलने हाक मारल्याचे समजताच संजूने तातडीने मागे फिरून राहुलची गळाभेट घेतली आणि त्याचे अभिवादन स्वीकारले. भारतीय क्रिकेटमधील या दोन स्टार खेळाडूंमधील बंध आणि परस्परांबद्दलचा आदर पाहून चाहते भारावून गेले आहेत.
@deepu_drops pic.twitter.com/UTSkS2r6nf
— Deepu Backup (@DeepuBackup1) March 15, 2026
दोघांचाही आपापल्या विश्वचषक विजयात वाटा – Sanju Samson Hug
केएल राहुल या सोहळ्यात ‘चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५’ चा विजेता खेळाडू म्हणून उपस्थित होता. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. तर दुसरीकडे, संजू सॅमसन सध्या भारतीय क्रिकेटमधील सर्वात चर्चेतील नाव आहे. एकेकाळी सातत्य नसल्यामुळे टीकेचा धनी ठरलेला संजू या विश्वचषकात ‘मॅच विनर’ म्हणून समोर आला.
संजूचा ऐतिहासिक फॉर्म – Sanju Samson Hug
संजूने वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ९७, इंग्लंडविरुद्ध ८९ आणि फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ८९ अशा सलग तीन वादळी खेळी करून भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले. या अफाट कामगिरीमुळेच त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ हा किताब मिळाला. नमन अवॉर्ड्समधील या दोघांच्या भेटीने “मैदानावर स्पर्धा असली तरी मैदानाबाहेर आम्ही एकच आहोत,” हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला.





