Sanju Samson Honor : केरळच्या सुपुत्राचा शाही थाट! विश्वविजेत्या संजू सॅमसनचा राज्य सरकारकडून गौरव; तिरुवनंतपुरममध्ये रंगणार भव्य सोहळा
Sanju Samson Honor : केरळचे क्रीडा मंत्री व्ही. अब्दुरहीमान यांनी जाहीर केले की, सोमवारी तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियमवर संजूचा विशेष नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

Sanju Samson honor Kerala government felicitation ceremony : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधील विजयाचा महानायक ठरलेल्या संजू सॅमसनसाठी केरळ सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. केरळचे क्रीडा मंत्री व्ही. अब्दुरहीमान यांनी जाहीर केले की, सोमवारी तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियमवर संजूचा विशेष नागरी सत्कार करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार असून, यावेळी अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शून्यातून विश्वविजेतेपदापर्यंतचा प्रवास –
संजू सॅमसनसाठी हा विश्वचषक संघर्षाचा आणि जबरदस्त पुनरागमनाचा ठरला. स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याला केवळ ४६ धावा करता आल्या होत्या. अगदी ग्रुप स्टेजमध्येही अभिषेक शर्मा आजारी पडल्यामुळे त्याला संधी मिळाली होती. मात्र, एकदा लय सापडल्यानंतर संजूने मागे वळून पाहिले नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात त्याने आक्रमक सुरुवात केली आणि त्यानंतर नॉकआउट फेरीत आपली खरी ताकद दाखवून दिली.
नॉकआउट सामन्यांचा ठरला किंग!
3️⃣2️⃣1️⃣ RUNS 🔥
3️⃣ FIFTIES 👏
8️⃣0️⃣.2️⃣5️⃣ AVERAGE ✨A performance for the ages from SANJU SAMSON 🫡#TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue | #Final | #INDvNZ | @IamSanjuSamson pic.twitter.com/oUDtppO3Mv
— BCCI (@BCCI) March 8, 2026
संजूने वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात नाबाद ९७ धावा कुटल्या. त्यानंतर मुंबईत इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये ८९ आणि अहमदाबादमधील फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पुन्हा ८९ धावांची वादळी खेळी केली. संपूर्ण स्पर्धेत ५ डावांत ३२१ धावा करत त्याने विराट कोहलीचा एका आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा भारतीय विक्रम मोडीत काढला. या अतुलनीय कामगिरीमुळेच त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ हा किताब मिळाला.
युवा खेळाडूंसाठी प्रेरणा –
विझिंजम सारख्या लहान गावातून येऊन जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या संजूचा हा प्रवास केरळमधील लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. कठीण काळातून जात असतानाही त्याने दाखवलेला संयम आणि जिद्द याचे कौतुक करण्यासाठी क्रीडा विभागाने या सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे.





