Sanju Samson Post : ‘जगासाठी मी कोणीही असलो, तरी तू मला…’, विश्वविजेतेपदानंतर संजू सॅमसनने पत्नीसाठी लिहिली ह्रदयस्पर्शी पोस्ट
Sanju Samson Post : या ऐतिहासिक यशानंतर संजूने आपल्या यशाचे श्रेय पत्नी चारुलता हिला दिले आहे.

Sanju Samson emotional post share for wife Charulatha : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाला चॅम्पियन बनवण्यात संजू सॅमसनचा सिंहाचा वाटा राहिला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला प्लेइंग इलेव्हनमध्ये नसलेल्या संजूने केवळ ५ सामन्यांत ८०.२५ ची सरासरी आणि १९९.३७ च्या स्ट्राईक रेटने ३२१ धावा कुटल्या. त्याने विराट कोहलीचा एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही मोडीत काढला. या ऐतिहासिक यशानंतर संजूने आपल्या यशाचे श्रेय पत्नी चारुलता हिला दिले आहे.
संघर्षाच्या काळात चारुलताची खंबीर साथ –
संजू सॅमसनची क्रिकेट कारकीर्द तशी अनेक चढ-उतारांनी भरलेली राहिली आहे. २०१५ मध्ये पदार्पण करूनही १६ वर्षांत त्याला अवघे ६० सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र, या पडत्या काळात त्याची पत्नी चारुलता सावलीसारखी त्याच्या मागे उभी राहिली. संजू आणि चारुलत तिरुवनंतपुरमच्या मार इव्हानिओस कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. संजूने फेसबुकवर पाठवलेल्या एका फ्रेंड रिक्वेस्टपासून सुरू झालेला हा प्रवास ५ वर्षांच्या डेटिंगनंतर २२ डिसेंबर २०१८ रोजी लग्नात रूपांतरित झाला.
“तू माझा सर्वात चांगला आणि वाईट काळ पाहिलास”
View this post on Instagram
विजयानंतर संजूने चारुलतसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. तो लिहितो, “ज्या दिवशी तुला पहिल्यांदा भेटलो, तेव्हापासून तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस. जगासाठी मी कोणीही असलो, तरी तू मला मी जसा आहे तसा स्वीकारलंस. माझ्या आयुष्यात क्रिकेटचे महत्त्व किती मोठे आहे, हे तू समजून घेतलंस. मी ज्या तीव्रतेने हे स्वप्न पाहिलं होतं, तितक्याच तीव्रतेने तू माझ्यासोबत प्रार्थना केलीस. खूप खूप धन्यवाद, माझ्या प्रिय ‘पॉन्डाटी’ (पत्नी).”
Dear Cow Belt Chaddis
His name is Sanju Samson
His spouse name is Charulatha Remesh
Both are Somalians
And that’s #RealKeralaStory pic.twitter.com/5aEk3JFZon
— RajSpeak Parody ☭ (@RajSpeak_) March 9, 2026
हेही वाचा – Shoaib Akhtar Criticizes : “भारताने क्रिकेटचं वाटोळं केलं!” टीम इंडियाच्या विजयानंतर अख्तरचा जळफळाट; आमिरनेही ओकली गरळ
सामान्यातल्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या संजूने बालपणापासून पाहिलेला संघर्ष आणि पत्नीने त्याला दिलेली साथ आज त्याला विश्वविजेतेपदापर्यंत घेऊन आली आहे. त्याने पाच सामन्यात केवळ धावाच केल्या नाहीत, तर अनेक विक्रमांनाही गवसनी घातली. त्याचबरोबर तो एका विश्वचषकाच्या हंगामात सर्वाधिक (२४) षटकार ठोकणारा खेळाडू ठरला, यासह त्याने रोहित शर्माचा (१५ षटकार) विक्रम मोडला.





