‘नकोशी’पासून ते आयएएस अधिकारी…! ; वाचा संजिता महापात्रा यांचा प्रेरणादायी प्रवास

Sanjita Mohapatra। आजच्या पुढारलेल्या जगात असे अनेक कुटुंब आहेत ज्यांना त्यांच्या वंशाला केवळ मुलगाच हवा असा आग्रह असतो. दरम्यान, असाच आग्रह एका कुटुंबात करण्यात आला ज्यावेळी त्यांच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी एका मुलीने जन्म घेतला. पण पालकांना मुलगा हवा होता त्यामुळे कुटुंब इतके निराश झाले. याच नैराश्यात कुटुंबाने या मुलीला सोडून देण्याचाही धाडसी निर्णय घेतला होता पण त्या मुलीच्या आणि तिच्या कुटुंबाच्या भविष्यात काही तरी वेगेळेच लिहिले होते . कारण आता याच नकोशी असणाऱ्या मुलीने तिच्या घरातील प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावली आहे.
अमरावतीच्या आयएएस अधिकारी संजीता महापात्रा यांच्या आयुष्यातील ही आपबिती आहे. संजीता पहापात्राच्या कठोर संघर्षाची कहाणी कोणालाही प्रेरणा देण्यासाठी पुरेशी आहे. संजिता पहापात्रा या अमरावती जिल्हा परिषदेच्या सीईओ आहेत, ज्या त्याठिकाणच्या शिक्षण आणि आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी काम करत आहेत.
मोठ्या बहिणीच्या आग्रहामुळे संजिताला मिळाले कुटुंब
संजीता महापात्रा यांचा जन्म ओडिशातील राउरकेला येथील एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या पालकांचा मोठा हिरमोड झाला होता. कारण त्यांना मुलगा होण्याची मोठी अपेक्षा होती म्हणूनच संजीताच्या जन्माने कुटुंब आनंदी नव्हते. त्यावेळस त्यांच्या कुटुंबाने त्यांना जवळजवळ सोडून दिले होते, परंतु त्यांच्या मोठ्या बहिणीच्या आग्रहामुळे त्यांना आपल्या कुटुंबासमवेत राहण्याची संधी मिळाली.
संजीता महापात्राचे आयुष्य खूप संघर्षांमधून गेले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. सामाजिक संस्था, शिक्षक आणि शिष्यवृत्तींच्या मदतीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
पालकांनी मुलांच्या भविष्यासाठी घेतले कष्ट Sanjita Mohapatra।
संजिता महापात्रा यांच्या पालकांना जरी मुलगा हवा असला तरी त्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलींप्रती असलेली जबाबदारी कधीही टाळली नाही. याविषयी बोलताना महापात्रा यांनी, ‘त्यांच्या पालकांनी उदरनिर्वाहासाठी अनेक नोकऱ्या केल्या आणि त्यांच्या कारकिर्दीला आकार देण्यासाठी खूप कष्ट केले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर, संजीता महापात्रा यांना स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली. या काळात, संजीताने तिच्या गावात तिच्या पालकांसाठी घर बांधण्यास मदत केली. त्याची बहीण सध्या बंगळुरू येथील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये व्यवस्थापक आहे.
पाचव्या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण Sanjita Mohapatra।
आयएएस अधिकारी संजिता महापात्रा यांचे पालक त्यांच्या यश पाहून खूप आनंदी आहेत. संजीताला लहानपणापासूनच आयएएस अधिकारी व्हायचे होते. तिच्या पतीच्या पाठिंब्यामुळे ती हे स्थान मिळवू शकली. २०१९ मध्ये, संजीताने पाचव्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली.
दरम्यान, अमरावती जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून त्यांना बचत गटांमध्ये महिलांना सक्षम बनवायचे आहे आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारायचा आहे. त्यांनी स्वयंसेवा गटांच्या उत्पादनांसाठी ब्रँडिंग आणि पॅकेजिंगपासून ते लाँचिंगपर्यंत एक विशिष्ट बाजारपेठ निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
दरम्यान , वंशाला दिवाच हवा असे म्हणणाऱ्या लोकांसाठी संजिता महापात्रा या एक खरंच प्रेरणास्थान बनल्या आहेत . आई – वडिलांना नकोशी असणारी मुलगी आज त्यांचाच अभिमान बनली आहे.





