Maharashtra MLC Election Result 2026 : धक्कादायक आकडेवारी समोर! महायुतीला मोठा झटका; पाहा कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर?
Maharashtra MLC Election Result 2026 : लवकरच निकालाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. यामुळे या निवडणुकीत महायुतीचे सर्व जागा जिंकण्याचे स्पप्न भंगले असल्याचे चित्र आहे.

Maharashtra MLC Election Result 2026 : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. कालपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, अद्यापही मतमोजणी सुरू आहे. ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींसाठी प्रतिष्ठनेची मानली जात आहे.
६ जागांमध्ये ३ जागांवर महाविकास आघाडी तर २ जागांवर महायुतीच्या उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. लवकरच निकालाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. यामुळे या निवडणुकीत महायुतीचे सर्व जागा जिंकण्याचे स्पप्न भंगले असल्याचे चित्र आहे.
मराठवाडा
मराठवाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील हे आघाडीवर आहेत. तर महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण पिछाडीवर आहेत. प्रतापसिंह पाटील यांना ७३९३२ मते मिळाली आहेत. तर सतीश चव्हाण यांना ६०७६८ मते मिळाली आहेत.
नागपूर
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीची सुधाकर कोहळे हे आघाडीवर आहेत. त्यांना ६०,९२४ मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे अभिजीत वंजारी यांना ५६,६३० मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना २४,२४९ मते मिळाली आहेत.
अमरावती
अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक यांना ८५७५ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना ४९२५ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ४९२१ मते मिळाली आहेत.
पुणे
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. भाजपचे कौस्तुभ गावडे यांना १७६०० मते मिळाली आहेत. काँग्रेसचे जयंत आसगावकर यांना ८३५० तर शिंदे गटाचे सचिन सानप यांना ११३२८ मते मिळाली आहेत. त्यामुळे पुण्यात शिक्षकमधून गावडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर पुणे पदवीधरमध्ये भाजपच्या स्मिता जाधव यांना १ लाख २ हजार मते मिळाली आहेत. तर शरद पवार गटाच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांना १ लाख १२ हजार ४०० मते मिळाली आहेत. त्यामुळे हर्षदा देशमुख जाधव यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
King Poster: शाहरुख खानचा ‘किंग’ अवतार चर्चेत! काजोल, करीना अन् झोया अख्तरनेही केलं कौतुक




