Cosmos Bank : कॉसमॉस बँक व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी ‘संजीव खडके’ यांची निवड
कॉसमॉस बँकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये संजीव नरहरी खडके यांची व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

Cosmos Bank : कॉसमॉस बँकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये संजीव नरहरी खडके यांची व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
जानेवारी २०२४ पासून खडके कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळातील सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सदर सभेमध्ये अमरनाथ अशोक चक्रदेव व श्री दीपक नाथाजी माने यांचा व्यवस्थापन मंडळाचे सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.
संजीव खडके यांना सहकारी बँकिंग, वित्तीय नियमन, सार्वजनिक प्रशासन, कृषी बाजार प्रशासन या क्षेत्रांमध्ये ३६ वर्षांहून अधिक कामकाजाचा अनुभव आहे. सार्वजनिक धोरण, बँकर आणि प्रशासन तज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे.
महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना धोरणात्मक मार्गदर्शन करणे, प्रशासकीय सुधारणांची अंमलबजावणी करणे आणि नियामक चौकट मजबूत करणे या विषयातील तज्ज्ञ म्हणून खडके परिचित आहेत.
अमरनाथ चक्रदेव व्यावसायिक असून अभियांत्रिकी क्षेत्राचा त्यांना ३० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी तीन स्टार्टअप्स सुरू केले आहेत. दीपक माने हे व्यावसायिक असून २५ वर्षांहून अधिक काळ ते बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत.





