संजय शिरसाट संतापले म्हणाले,’ते माजलेल्या बापाची मुलं असतात ना, त्यांच्याकडून असे अपघात’

Pune Porshe Car । कल्याणीनगर येथे भरधाव पोर्शे कारने दुचाकीवरील दोघांना उडवले. यामध्ये तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही कार एका बड्या बांधकाम व्यवसायीकाच्या मुलाची होती.
या प्रकरणी सत्य परिस्थिती पोलीस आणि इतर यंत्रणांच्या समोर आली. त्याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पुणे पोलीस आयुक्त, आणि गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घेतली. अशात यावरून राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे अपघात प्रकरणात माजलेल्या बापाच्या मुलांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलतांना संजय शिरसाट म्हणाले,’हे सलमानसारखं प्रकरण आहे, आरोपवीर कठोर कारवाई झाली पाहिजे. याची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत ते पुढे म्हणाले,ते माजलेल्या बापाची मुलं असतात ना, त्यांच्याकडून असे अपघात होत असतील ना तर त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे. याला पक्ष नाही, याला जात नाही, याला धर्म नाही. कोणत्याही गरिबाच्या, सर्वसामान्याच्या शरीरावर गाडी चालवायची, आणि त्यात त्याचा मृत्यू होतो.’
ते पुढे म्हणाले,’अन मग हे फरार होतात. अशा लोकांना कोणीही पाठिशी घालणार नाही. तो कितीही मोठ्या बापाचा लेक असला तरीही… हे सलमान सारखंच प्रकरण झालं ना. अनेक लोक बेधुंद होऊन गाड्या चालवतात, ते मोठ्या घरचे असेल तर काय झालं ? सामान्य लोकांचा जीवही तितकाच महत्वाचा आहे. याप्रकरणी न्यायालयाने जो आदेश दिला, त्याचं पालन झालंच पाहिजे असं संजय शिरसाट म्हणाले. तसंच या अपघाताची एसआयटी मार्फतही चौकशी झालीच पाहिजे अशी मागणीही शिरसाट यांनी केली.
हे वाचाल का ? ‘पराभव दिसू लागल्याने उद्धव ठाकरेंचं रडगाणं’, देवेंद्र फडणवीसांच प्रतिउत्तर





