Sanjay Shirsat : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; मंत्री संजय शिरसाट यांचा दावा
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे दिसते. लवकरच विविध नेत्यांच्या भूमिका स्पष्ट होतील, असा दावा मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी रविवारी केला.

Sanjay Shirsat : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे दिसते. लवकरच विविध नेत्यांच्या भूमिका स्पष्ट होतील, असा दावा मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी रविवारी केला. दिवाळीनिमित्त पत्रकारांशी बोलताना शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार आणि राष्ट्रवादी(शप) अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीचा उल्लेख करत, काही राजकीय घडामोडी घडत असल्याचे सांगितले.
शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, मी आधीच सांगितले होते की, काही राजकीय घडामोडी घडतील आणि आता त्या घडताना दिसत आहेत. आता फक्त हे पाहायचे आहे की, कोणता गट कोणामध्ये विलीन होतो. मला वाटते की, या घडामोडी अंतिम टप्प्यात आहेत आणि लवकरच विविध नेत्यांच्या भूमिका निश्चित होतील, असे ते म्हणाले.शिंदेसेना आणि ठाकरेसेना यांच्यात पुन्हा विलीनीकरण शक्य आहे का, असे विचारले असता शिरसाट म्हणाले की, त्यांचा पक्ष नवीन लोकांना सामावून घेण्यास तयार आहे. जर कोणी आमच्याकडे येत असेल, तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे ते म्हणाले.
आम्ही सरकारमार्फत सामान्य जनतेला मदत पुरवतोच, परंतु एक पक्ष म्हणूनही आम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहोत, जेणेकरून त्यांना वाटावे की त्यांच्या पाठीशी कोणीतरी आपले माणूस उभे आहे. सण साजरा करणे सोपे व्हावे म्हणून आम्ही त्यांना काही वस्तू दिल्या आहेत. हा उपक्रम संपूर्ण राज्यभरात राबवला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
तर त्यांनीही मदत द्यावी
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने दिलेल्या ५,००० रुपयांच्या आर्थिक मदतीवर विरोधकांनी केलेल्या टीकेचा उत्तर देताना शिरसाट म्हणाले, इतर राजकीय पक्षांनाही हवी असल्यास अशी मदत देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. ५,००० रुपयांची मदत ही सरकारी मदत आहे. जर विरोधकांना यावर आक्षेप असेल, तर त्यांनी स्वतःही अशीच मदत द्यावी. लाडकी बहीण योजनेच्या वेळीही त्यांनी असेच केले होते. त्यांना मदत देण्यापासून कोणी रोखले होते का? त्यांनी तर दिवाळीनिमित्त लोकांपर्यंत पोहोचताना त्यांना अन्नपदार्थांचे वाटपही केलेले नाही, असा दावा त्यांनी (Sanjay Shirsat) केला.






