Parth Pawar Meet Sharad Pawar : पार्थ पवार दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग
राष्ट्रवादी काँग्रेस(शप)चे प्रमुख शरद पवार यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राष्ट्रवादी नेते पार्थ पवार यांनी शरद पवारांची (Parth Pawar Meet Sharad Pawar) भेट घेतली.

Parth Pawar Meet Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस(शप)चे प्रमुख शरद पवार यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राष्ट्रवादी नेते पार्थ पवार यांनी शरद पवारांची (Parth Pawar Meet Sharad Pawar) भेट घेतली. सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन काल पार्थ पवारांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते.
तब्बल दीड तास पवारांची भेट घेतल्यावर पार्थ पवार निघाले. अशातच आज पुन्हा एकदा पार्थ पवार सिल्व्हर ओक निवासस्थानी (Parth Pawar Meet Sharad Pawar) दाखल झाले होते. आज पुन्हा पार्थ पवार शरद पवारांना भेटायला आल्याने चर्चेला उधाण आले. माहितीनुसार, काल पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन पार्थ पवारांनी त्यांची भेट घेतल्याने या भेटीगाठीबाबत आता विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आल्याची चर्चा आहे.
विलीनीकरणाच्या चर्चा आणि भेटीगाठीवर बोलताना राजेंद्र पवार म्हणाले, मी काय ते फारसे ऐकलेले नाही आणि मला असे समजते की, पवारसाहेब आजारी असताना तिथे प्रफुल्ल पटेल येऊन त्या संदर्भात काहीतरी चर्चा झालेली आहे. पण माझे वैयक्तिक मत वेगळे, रोहितचे वेगळे असेल, पवारसाहेबांचे आणि सुप्रिया सुळेंचे वेगळे असेल. त्यामुळे मला असे वाटते की, या मताला फार काही महत्त्व नाही.
कारण विलिनीकरण (Parth Pawar Meet Sharad Pawar) खरेच होणार आहे का? एकत्र दोन्ही पक्ष विलीन होणार आहेत का? किंवा विलीन झाले, तर बीजेपीची साथ देणार आहेत का? मला तर यातील काही माहित नाही आणि अजून मला वाटते त्यांनी काही अशा स्पष्ट केलेल्या नाहीत. विलिनीकरणाबाबत पक्षाचे जे प्रमुख आहेत, तेच बोलतील, असे वक्तव्य राजेंद्र पवारांनी केले.






